मुक्तपीठ टीम
सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिके अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ८ जागा, आयुष वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ५ जागा, जी.एन.एम या पदासाठी ३६ जागा अशा एकूण ४९ पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १)वैद्यकीय अधिकारी- एमबीबीएस
२) आयुष वैद्यकीय अधिकारी- बीएएमएस / बीयूएमएस/ बीएचएमएस
३) जी.एन.एम- जीएनएम, बी.एससी (नर्सिंग) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट http://smkc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.