मुक्तपीठ टीम
स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, मेडिकल ऑफिसर, कंसल्टंट, ट्रेनी ऑपरेटर कम टेक्निशियन, ट्रेनी अटेंडंट कम टेक्निशियन, ट्रेनी अटेंडंट कम टेक्निशियन/ अवजड वाहन चालक, बॉयलर ऑपरेटर कम टेक्निशियन, बॉयलर अटेंडंट कम टेक्निशियन या पदांवर एकूण १५८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण पश्चिम बंगाल आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ केमिकल/ पॉवर प्लांट/ प्रोडक्शन/ इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात ६५% गुणांसह बीई/ बीटेक २) बॉयलर ऑपरेशन इंजिनीअर प्रमाणपत्र
- पद क्र.२- १) मेकॅनिकल/ केमिकल/ मेटलर्जी/ सिरॅमिक या विषयात ६०% गुणांसह बीई/ बीटेक २) ०७ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) एमबीबीएस २) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.४- १) पदव्युत्तर पदवी/ डीएनबी २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) मेकॅनिकल/ मेटलर्जी/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ केमिकल/ सिव्हिल/ सिरॅमिक या क्षेत्रात ५०% गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) इलेक्ट्रिशियन/ फिटर/ टर्नर/ वेल्डर या क्षेत्रात आयटीआय/ एनसीव्हीटी
- पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहन चालक परवाना ३) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.८- १) १०वी उत्तीर्ण २) मेकॅनिकल/ केमिकल/ पॉवर प्लांट/ प्रोडक्शन/ इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रात ५०% गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा ३) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
- पद क्र.९- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय ३) द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पद क्र.१ साठी ३० वर्षांपर्यंत, पद क्र.२ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी ३४ वर्षांपर्यंत, पद क्र.४ साठी ४१ वर्षांपर्यंत, पद क्र.५,६,७,८ साठी २८ वर्षांपर्यंत तर, पद क्र.९ साठी ३२ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
- पद क्र.१ ते ४ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
- पद क्र.५ आणि ८ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
- पद क्र.६,७ आणि ९ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.sail.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://sailcareers.com/secure?app_id=UElZMDAwMDAwMQ==
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1ptTiA_qQbPi5JhrBRRlqqTYudRwRgODS/view