मुक्तपीठ टीम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात वैद्यकीय सल्लागार पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्जदाराकडे मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी असणे गरजेचे आहे. अर्जदाराला कोणत्याही रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिशनर म्हणून औषधोपचार करण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा.
निवड प्रक्रिया
बँक शॉर्टलिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवेल. मुलाखतीनंतर बँकेचे वैद्यकीय सल्लागार म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी उमेदवारांना वैद्यकीय परीक्षा चाचणी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेमधून जावे लागेल.
पगार किती मिळेल
आरबीआय नागपूर भरती २०२१ साठी पात्र उमेदवारांना तासाला १००० रुपये पगार देण्यात येईल. जर तुम्ही आठवड्यातून १५ तास आणि महिन्यात ६० तास काम केले तर तुम्हाला पगार म्हणून ६०,००० रुपये आणि वेगळे १००० रुपये (भाडे) मिळेल. आवश्यकतेनुसार आठवड्यात एकूण तासांची संख्या ३० तासापर्यंत वाढू शकता.
अर्ज कसा करावा?
- इच्छुक उमेदवार आरबीआयच्या वेबसाइटवर भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकतात.
- आवश्यक कागदपत्रांच्या फोटोकॉपीसह अर्ज भरावा.
- इच्छुक आणि पात्र उमेदवार प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, आरबीआय, मुख्य कार्यालय इमारत, डॉ. राघवेंद्र राव रोड, सिव्हिल लाईन्स, पोस्ट बॉक्स नं- १५, नागपूर, पिनकोड- ४४०००१ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
अधिक माहितीसाठी
आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in वरून माहिती मिळवू शकता.