मुक्तपीठ टीम
पुणे जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) या पदासाठी ४० जागा, आरोग्य सेविका (जीएनएम) या पदासाठी १०० जागा अशा एकूण १४० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ४ मे २०२१ पर्यंत महात्मा गांधी सभागृह, ६ वा मजला जिल्हा परिषद, पुणे येथे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत थेट मुलाखत देऊ शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- बीएएमएस
२) पद क्र.२- जीएनएम कोर्स असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची कोणतीही अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पुणे जिल्हा परिषदेतच्या अधिकृत वेबसाइट https://punezp.mkcl.org/ वरून माहिती मिळवू शकता.








Subscribe