मुक्तपीठ टीम
पुणे महानगरपालिकेत सहाय्यक विधी अधिकारी – वर्ग २ या पदासाठी एकूण ४ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, मान्यता प्राप्त विद्यापीठातून विधी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असावे, राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ ते ४३ वर्षांपर्यंत तर, अपंग उमेदवारांचे वय १८ ते ४५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून नियमांनुसार शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pmc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.