मुक्तपीठ टीम
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात म्हणजेच ओएनजीसीमध्ये एईई या पदासाठी २२० जागा, केमिस्ट या पदासाठी १४ जागा, जियोलॉजिस्ट या पदासाठी १९ जागा, जियोफिजिसिस्ट या पदासाठी ३५ जागा, मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर या पदासाठी १३ जागा, ट्रांसपोर्ट ऑफिसर या पदासाठी ८ जागा अशा एकूण ३०९ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- ६०% गुणांसह मेकॅनिकल/ पेट्रोलियम/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकॉम/ ई अॅंड सी/ इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/ अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग पदवी किंवा ६०% गुणांसह जियोफिजिक्स/ जियोलॉजी/ केमिस्ट्री/ गणित/ पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.२- ६०% गुणांसह एम.एससी (केमिस्ट्री)
- पद क्र.३- ६०% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा एमएससी/ एम.टेक (जियोलॉजी)
- पद क्र.४- ६०% गुणांसह जियोफिजिक्स/ फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी/ एम.टेक (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)
- पद क्र.५- ६०% गुणांसह कोणतीही इंजिनीअरिंग पदवी
- पद क्र.६- ६०% गुणांसह मेकॅनिकल/ ऑटो इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.ongcindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.