मुक्तपीठ टीम
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण २८० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख २१ मे २०२१ आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार १० जून २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
या विभागात होणार ऊरती
एनटीपीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ही भरती इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रूमेंटेशन विभागात केली जाईल. त्याचबरोबर या पदावर निवडलेल्या उमेदवारांना ४०,००० ते १,४०,००० वेतन दिला जाईल.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे २७ वर्ष असावे.
अशी केली जाईल निवड
गेट चॅट २०२१ च्या आधारे ग्रुप डिस्कशन (जीडी) आणि मुलाखतीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइट www.ntpccareer.net वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: