Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा”

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

May 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ashish shelar

मुक्तपीठ टीम

तौक्ते चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. डहाणूतील चिकू, आंबा, केळी, मिरची आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. घरांची पडझड झाली आहे, या सर्व बाबींचे पंचनामे करताना अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवावी, अशा सूचना भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी डहाणू दौऱ्या दरम्यान केल्या.

 

तौक्ते चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व मच्छीमारांना भेटण्यासाठी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार आणि आमदार मनिषा चौधरी दोन दिवस किनारपट्टीचा दौरा करीत आहेत.

 

आशिष शेलार यांनी डहाणू येथे चिकू उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. सरावली येथे चिकू उत्पादक शेतकऱ्यांची बैठक यावेळी घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, चिकूचे फळ तयार होण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. या वादळाने आता चिकूचे फळ तयार होत असताना हाताशी आलेले फळ तर वाया गेलेच शिवाय नवीन आलेला फुलोरा ही वाया गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या किसान ट्रेनमुळे चिकू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. नुकतेच ६ बोगी दिल्लीच्या मार्केटमधे गेल्या. त्यानंतर हंगाम सुरु होत असतानाच वादळाने बाग पुर्णपणे उद्धवस्त झाल्या. त्यासोबत याच पट्ट्यात केळी, आंबा, भात, मिरची सह कोळंबी उत्पादक शेतकऱ्याला ही मोठा फटका बसला आहे. याचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत.

 

डहाणू, चिंचणी, बोर्डी या परिसरातील चिकू उत्पादक शेतकऱ्यांचे वादळामुळे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले फळ वाया तर गेलेच शिवाय नवीन आलेला फुलोरा ही गेला. आज प्रत्यक्ष बागेत जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. त्यांना धीर दिला. @manishaBJP @BJP4Maharashtra pic.twitter.com/bV8uPMbqJe

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 20, 2021

 

ज्या ज्या वेळी अशा नैसर्गिक आपत्ती मध्ये शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाते त्यावेळी या भागातील शेतकऱ्यांना कधीच मदत मिळत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात चिकू उत्पादक शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतीचा पिक विमा उतरवला जात होता. मात्र आघाडी सरकारने या नियमात बदल केल्याने केवळ ४ एकरचा विमा उतरवला जातो. त्यातही ५० टक्केच रक्कम मिळते. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला शासनाने तातडीने मदत करावी, तसेच पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशा मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या.

 

यावेळी आमदार मनिषा चौधरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, सर्व बाबींचे तातडीने पंचनामे करा. अशा संकटकाळी योग्य मागणी आणि वस्तुस्थिती सांगणारे पंचनामे होणे आवश्यक असतात. पण आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, अधिकारी पंचनामे नीट करीत नाहीत आणि योग्य मागणीच होत नाही. त्यामुळे तातडीने पंचनामे करा अशा सुचना त्यांनी केल्या.

 

तर आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हणाले की, शेतकऱ्यांवरील संकट मोठे आहे. तसेच नुकसान भरपाई देणारा जीआर तोकडा आहे. त्यामुळे शासनाने अधिकचा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकार्यांनी नुकसानीच्या दाहकतेचे वास्तव चित्र कागदोपत्री दिसेल अशा पद्धतीने पंचनामे करावे. आम्ही विधानसभेत, प्रसंगी केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांचे म्हणणे, व्यथा, मागण्या आक्रमकपणे मांडू, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पक्ष म्हणून सुध्दा भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वस्त केले.

 

या बैठकीत कोरोनाचे नियम पाळून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन नाईक आणि स्थानिक भाजपा पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थितीत होते.


Tags: ashish shelardevendra fadanvisPalgharprime minister narendra modiअँड आशिष शेलारदेवेंद्र फडणवीसपंतप्रधान नरेंद्र मोदीपालघर
Previous Post

एनटीपीसीमध्ये कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी म्हणून संधी

Next Post

“मुंबईत वादळ, पावसाने नुकसान झालेल्यांना तातडीने भरपाई द्या”

Next Post
atul bhatkhalkar

"मुंबईत वादळ, पावसाने नुकसान झालेल्यांना तातडीने भरपाई द्या"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!