मुक्तपीठ टीम
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात म्हणजेच एनएचएआयमध्ये डेप्युटी मॅनेजर टेक्निकल या पदासाठी ७३ जागा तर, डेप्युटी मॅनेजर फायनान्स अॅंड अकाउंट्स या पदासाठी १७ जागा अशा एकूण ९० जागांवर ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, डेप्युटी मॅनेजर टेक्निकल या पदासाठी ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत तर, डेप्युटी मॅनेजर फायनान्स अॅंड अकाउंट्स या पदासाठी २९ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- डेप्युटी मॅनेजर टेक्निकल- १) सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी २) यूपीएससीद्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (आय.ई.एस) परीक्षा (सिव्हिल), २०२० मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर थेट भरती
- डेप्युटी मॅनेजर फायनान्स अॅंड अकाउंट्स- १) बी.कॉम/ सीए/ सीएमए/ एमबीए (फायनान्स) किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही संघटित वित्त किंवा खात्याशी संबंधित सेवेचा सदस्य २) ४ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे ३० वर्षांपर्यंत तर, पद क्र.२ साठी ३५ वर्षांपर्यंत वय असावे.
शुल्क
पद क्र.१ साठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट https://nhai.gov.in/#/ वरून माहिती मिळवू शकता.