मुक्तपीठ टीम
नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये २३० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. अॅप्रेंटिशच्या संधीचे ठिकाण कोची येथे आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अॅडमायरल सुप्रिटेंडन्ट, अॅप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कोची-६८२००४
अधिक माहितीसाठी
नेव्हल शिप रिपेअर यार्डच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.