मुक्तपीठ टीम
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये सिव्हिल ज्युनियर इंजिनीअर या पदासाठी ६८ जागा, इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनीअर या पदासाठी ३४ जागा, मेकॅनिकल ज्युनियर इंजिनीअर या पदासाठी ३१ जागा अशा एकूण १३३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.२- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.३- मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून २९५ रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार
नाही.
अधिक माहितीसाठी नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट http://www.nhpcindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ:








Subscribe