मुक्तपीठ टीम
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कनिष्ठ अभियंता पदासह सहाय्यक महाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, उपअभियंता, कनिष्ठ पर्यवेक्षक आणि सहाय्यक आयटी या पदांसाठी एकूण २७ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती मुंबईत होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवारांची शैक्षणिक पात्रता नियमानुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ४० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
जारी केलेल्या माहितीनुसार, विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यामुळे उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम www.mmrcl.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
- त्यानंतर करिअर विभागात ‘करिअर्स’ आणि नंतर एमएमआरसीएल भरती जाहिरात २०२२-०१’ वर जा.
- आता अर्ज भरा. तसेच त्यांच्या अर्जासोबत अपडेटेड रेझ्युमे, पासपोर्ट साइज फोटो (जेपीजी/ जेपीइजी) आणि अलीकडील पे स्लिपची स्कॅन प्रत पीडीएफ फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- यासह, भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या.
अधिक माहितीसाठी नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट www.mmrcl.com वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: