मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत अधिकारी पदांसाठी सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी ०२ जागा, अधिकारी- ग्रेड २ या पदासाठी ०५ जागा, कनिष्ठ अधिकारी या पदासाठी १० जागा अशा एकूण १७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) बी.ई./ बी.टेक (सीएस/ आयटी) किंवा/ एमसीए किंवा एमएससी (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) २) ०५ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) बी.ई./ बी.टेक (सीएस/ आयटी) किंवा/ एमसीए किंवा एमएससी (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) बी.ई./ बी.टेक (सीएस/ आयटी) किंवा/ एमसीए किंवा एमएससी (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी)/ बीसीएस/ बीएससी- आयटी/ बीसीए २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १ हजार ७७० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mscbank.com/ वरून माहिती मिळवू शकता.