मुक्तपीठ टीम
मीरा-भाईंदर मनपामध्ये वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, प्रसाविका, बायोमेडिकल अभियंता पदांच्या एकूण ४७३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता ०८ मे २०२१ हजर राहावे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) एमबीबीएस
२) पद क्र.२- बीएएमएस/बीएचएमएस/बीयूएमएस
३) पद क्र.३- १) दहावी/बारावी उत्तीर्ण
४)पद क्र.४- १) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी, आणि एका वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा
१८ ते ३८ वर्षे
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मुलाखतीचे ठिकाण: वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला मीरा भाईंदर महानगरपालिका (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय भाईंदर (प).
अधिक माहितीसाठी
मीरा भाईंदर मनपाच्या अधिकृत वेबसाइट https://www.mbmc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: