मुक्तपीठ टीम
मिलट्री इंजिनीअरिंग सर्व्हिसमध्ये ड्राफ्ट्समन या पदासाठी ११४ जागा, सुपरवाइजर(बी/एस) या पदासाठी ४५८ जागा अशा एकूण ५७२ पदांवर भरती आहे. अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, मटेरियल मॅनेजमेंट, प्रशासान यातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवार १७ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये डिप्लोमा
२) पद क्र.२- अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी + १ वर्ष अनुभव किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा सांख्यिकी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासनात पदवी + मटेरियल मॅनेजमेन्ट / वेअरहाउसिंग मॅनेजमेन्ट/ खरेदी / लॉजिस्टिक / सार्वजनिक खरेदी मध्ये डिप्लोमा+ २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी उमेदवारांकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार तर, इतर कोणत्याही वर्गातील उमेदवारांकडून शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
मिलट्री इंजिनीअरिंग सर्व्हिसच्या अधिकृत वेबसाइट https://mes.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: