Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना लस निर्मितीत महाराष्ट्र आत्मनिर्भर होणार! हाफकिनला केंद्राची परवानगी!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Haffkine Institute

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र सरकारला अखेर कोरोना लस निर्मितीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील हाफकिन इन्स्टिट्युटला कोरोना लसनिर्मितीची परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. हाफकिन इन्स्टिट्युट हा महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे. देशाला पोलियो मुक्त करणाऱ्या लसीच्या तसेच सर्पदंशालवरील लसींच्या निर्मितीसाठी हाफकिनची जगभरात ओळख आहे.

केंद्राच्या परवानगीनंतर आता हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

कोरोना लसीच्या उत्पादनासाठी लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने पुढे यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनचे संचालक संदिप राठोड, जनरल मॅनेजर सुभाष शंकरवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत १५४ कोटी खर्त करून हाफकिनमध्ये नवा प्लांटची योजना आखण्यात आली आहे.

कशी होणार मुंबईत कोरोना लसीची निर्मिती?

  • हाफकिनमार्फत सुरु करण्यात येणाऱ्या लसीचे उत्पादन दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.
  • पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग व फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • सध्या या लसीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते.
  • कोवॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे.
  • यापैकी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत आहे.

हाफकिन स्वतंत्रपणेही कोरोना लसीचे उत्पादन करणार

  • हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला ही लस ठोक प्रमाणात लवकर मिळाल्यास येत्या एप्रिल किंवा मेपासून हाफकिनमार्फत ही लस उपलब्ध केली जाईल.
  • स्वतंत्रपणे करोना लसीचे उत्पादन करण्यासाठी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल.
  • हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोरोना लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरु ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या प्लांटमधून श्वान दंशावरील लस विकसित करुन या लसीचे उत्पादन घेण्यात येईल
  • तसेच वेळीवेळी लागणाऱ्या अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्लांटचा उपयोग करण्यात येईल.

भारत बायोटेककडून ठोक स्वरुपात कोरोना लस पुरविण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हाफकिनला परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता.

 


Tags: corona vaccineHaffkine InstituteMaharashtraकोरोना लसमहाराष्ट्रहाफकिन इन्स्टिटयूट
Previous Post

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सरकारचा अॅक्शन प्लान

Next Post

मिलट्री इंजिनीअरिंग सर्व्हिसमध्ये ५७२ जागांसाठी भरती

Next Post
nokari

मिलट्री इंजिनीअरिंग सर्व्हिसमध्ये ५७२ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!