मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय अधिकारी, गट-ब या पदासाठी ४२७ जागा, अलिबाग येथे वैद्यकीय अधिकारी, गट-ब या पदासाठी ०१ जागा, सातारा येथे वैद्यकीय अधिकारी, गट-ब या पदासाठी ०१ जागा अशा एकूण ४२९ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमबीबीएस केलेले असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १९ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ३९४ रूपये आकारले जाणार तर, मागासवर्गीय आणि इतर आर्थिक स्थिती वाईट असणाऱ्या उमेदवारांकडून २९४ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://www.mpsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
४२७ जागा
https://www.mpsc.gov.in/downloadFile/english/5320
सातारा
https://www.mpsc.gov.in/downloadFile/english/5322
अलिबाग
https://www.mpsc.gov.in/downloadFile/english/5321