Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत सीमेवर S-400 क्षेपणास्त्र तैनात करणार, हवाई हल्ला होण्याआधीच रोखणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
S-400 Missile

मुक्तपीठ टीम

भारतीय सीमेवर सतत लढाऊ विमाने पाठवणाऱ्या चिनी ड्रॅगनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत जोरदार तयारी करत आहे. भारत पुढील दोन ते तीन महिन्यांत चीनच्या सीमेवर आपले दुसरे हवाई संरक्षण प्रणाली S-400 क्षेपणास्त्र सक्रिय करेल. S-400 च्या तैनातीमुळे, भारतीय वायुसेना केवळ चिनी लढाऊ विमाने, बॉम्बर, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांनी दुरूनच ओळखली जाणार नाही तर, एका झटक्यात त्यांचा नाशही करेल. भारताच्या या निर्णयामुळे चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

S-400 हवाई संरक्षण प्रणाली भारतीय लष्कराला आणखी मजबूत करेल. ते चीनने पाठवलेली लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि स्ट्रॅटेजिक बॉम्बर यांचा शोध घेईल आणि एका झटक्यात नष्ट करेल. १५ ऑक्टोबर २०१६ रोजी भारत आणि रशियामध्ये या क्षेपणास्त्र प्रणालीबाबत करार झाला होता. हा करार सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा आहे. दोन्ही देशांमधील या संरक्षण कराराच्या पाच वर्षानंतर भारताला ही क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार आहे.

वायव्य सीमेवर एस-400 क्षेपणास्त्र तैनात, चीन आणि पाकिस्तानमध्ये भितीचे वातावरण

  • भारताने आपल्या रणनीतीचा भाग म्हणून हे S-400 हवाई संरक्षण यंत्रणा वायव्य सीमेवर तैनात केले आहे.
  • रशियन S-400 क्षेपणास्त्र प्रणालीमुळे भारतीय शत्रूंची चिंता वाढली आहे.
  • चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून एकाच वेळी हवाई धोक्यांचा सामना करणे हा त्याचा उद्देश आहे.
  • S-400 चीनच्या आघाडीवर तैनात केले जाईल. या क्षेपणास्त्र प्रणालीमुळे भारताची सुरक्षा यंत्रणा मजबूत होणार आहे.
  • भारत पुढील दोन-तीन महिन्यांत चीन सीमेवर आपले दुसरे S-400 क्षेपणास्त्र सक्रिय करेल.

हवाई संरक्षण प्रणाली काय काम करते?

हवाई संरक्षण यंत्रणेत कोणत्याही संभाव्य हवाई हल्ल्याचा लवकर शोध घेण्याची क्षमता असते. याशिवाय क्षेपणास्त्रविरोधी मारा करून शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रे हवेत नष्ट करू शकतात. भारताने आतापर्यंत रशियाकडून केवळ मारण्यासाठी शस्त्रे खरेदी केली आहेत. भारत पहिल्यांदाच रशियाकडून S-400 संरक्षण प्रणाली खरेदी करत आहे.

 

पाहा व्हिडिओ:

 


Tags: Air Defense Systemair Strikegood newsIndia BorderIndian ArmymuktpeethS-400 MissileS-400 क्षेपणास्त्रघडलं-बिघडलंचांगली बातमीभारत सीमाभारतीय लष्करमुक्तपीठहवाई संरक्षण प्रणालीहवाई हल्ला
Previous Post

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवावर्गाला अधिक संधी, आताच नाव नोंदवा!

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय विभागात ४२९ जागांवर संधी

Next Post
mpsc

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय विभागात ४२९ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!