मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भूकरमापक तथा लिपिक या पदासाठी पुणे प्रदेश विभागात १६३ जागा, कोकण प्रदेश, मुंबई विभागात २४४ जागा, नाशिक प्रदेश विभागात १०२ जागा, औरंगाबाद प्रदेश विभागात २०७ जागा, अमरावती प्रदेश विभागात १०८ जागा, नागपूर प्रदेश विभागात १८९ जागा अशा एकूण १,०१३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ पदवी/ पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा) किंवा १०वी उत्तीर्ण + आयटीआय (सर्वेक्षक)
- मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या अमागास प्रवर्गातील उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://mahabhumi.gov.in/mahabhumilink वरून माहिती मिळवू शकता.