मुक्तपीठ टीम
जळगावच्या कृषी विज्ञान केंद्रात सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट, प्रोग्राम सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, ड्रायव्हर, सहाय्यक कर्मचारी अशा एकूण ८ जागांसाठी भरती आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट- मान्यताप्राप्त विद्यापीठातून गृहविज्ञान, कृषी अभियांत्रिकी आणि अॅनिमल सायन्समधून पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता
२) प्रोग्राम सहाय्यक (लॅब तंत्रज्ञ) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी पदवी किंवा समकक्ष पात्रता
३) स्टेनोग्राफर- मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२वी पास पास किंवा समकक्ष
४)ड्रायव्हर- मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक पास पात्रता आणि विहित सरकारकडून वैध आणि योग्य ड्रायव्हिंग परवाना
५) सहाय्यक कर्मचारी- मॅट्रिक किंवा समकक्ष पास किंवा आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपर्यंत, प्रोग्राम सहाय्यक (लॅब तंत्रज्ञ) या पदासाठी ३० वर्षांपर्यंत, स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर या पदासाठी १८ ते २७ वर्ष, सहाय्यक कर्मचारी या पदासाठी १८ ते २५ वर्ष वय असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
मा. सचिव, सातपुडा विकास मंडळ, पाल., ता. रावेर, जि. जळगाव, महाराष्ट्र ४२५५०४
अधिक माहितीसाठी
कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकृत वेबसाइट https://kvk.icar.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.