मुक्तपीठ टीम
कोकण रेल्वेत पदवीधर अॅप्रेंटिशिपसाठी बीई सिव्हिल या पदासाठी ३० जागा, बीई इलेक्ट्रिकल या पदासाठी ३० जागा आणि बीई इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन या पदासाठी १८ जागा आहेत. तर, टेक्निशियन अॅप्रेंटिशिपसाठी डिप्लोमा सिव्हिल या पदावर २४ जागा, डिप्लोमा इलेक्ट्रिकल या पदावर २८ जागा अशा एकूण १३९ जागांसाठी ही अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पदवीधर अप्रेंटिस- संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी २) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस- संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते २५ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईडब्ल्यूएस/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://konkanrailway.com/ वरून माहिती मिळवू शकता.