मुक्तपीठ टीम
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांसाठी अर्ज मागविलेयत. कोकण रेल्वेत सहाय्यक लेखा अधिकारी, लेखा सहाय्यक आणि उपमहाव्यवस्थापक वित्त यांच्या एकूण ११ पदांवर भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. याविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
- अर्ज करणारा उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीकॉम पदवी घेतली पाहिजे.
- याखेरीज लेखा विभागात तीन वर्षांचा अनुभव असावा.
- तर सहाय्यक लेखा अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सीएमए आणि सीए पदवी असणे आवश्यक आहे.
- विभाग अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीकॉम पदवी घेतली पाहिजे.
- डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्स पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये सीएमए आणि सीए असावेत.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट konkanrailway.com वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: