Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बेजबाबदार कारखानदारांवर प्रवीण तरडे संतापले, मुळशीची रग दाखवण्याचा इशारा!

४० बाय ४० जागेत ३८ कामगार, १२ मशिन्स! आगीत १८ कामगार होरपळून मेले...संतापाचा भडका!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pravin tarde

मुक्तपीठ टीम

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडेमधील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १८ स्त्री-पुरुष कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मुळशी पॅटर्नमुळे चर्चेत आलेले अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे हे याच तालुक्यातील. त्यामुळे त्यांनी कारखान्याला भेट दिली. राख झालेला तो अरुंद परिसर पाहून ते संतापले. त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला, “आपल्या मुळशीतील आपले भाऊ-बहिण कुठे आणि कसे काम करतात, याची पाहणी आणि चौकशी आपण केलीच पाहिजे. आता बस झालं. मुळशी तालुक्याची रग दाखवून देऊ, कंपन्यांत घुसून पाहणी करु!”

pravin tarde

मला परिस्थिती माहित आहे

• मी इथल्याच शेजारच्याच कंपनीत जवळपास दोन ते तीन वर्ष काम केले आहे.
• मला इथली परिस्थिती माहिते आहे.
• आपले आय-बाप, बहीण भाऊ असेच महिन्या-वर्षांनी जळणार, आणि आपण हाच तमाशा पाहत बसायचं का?
• मी इथल्या सगळ्या सरपंच आणि उपसरपंच यांना विनंती करतो की आता आपले भाऊ बहीण- आई बाप, आपले नातलग जिथं कुठे काम करत अशतील तिथे आपण जाऊ, त्यांना विनंती करु, की आमची जवळची माणसं कुठं काम करतात, हे आम्हाला पाहू द्या.
• त्यांनी नाही ऐकले तर आपण कंपन्यांत घुसू.
• ते कुठल्या परिस्थितीत काम करतात, हे आपल्याला पाहावेच लागेल.
• दहा ठिकाणी आपली रग माहिती आहे, आता आपली रग आपल्या आई-बापांसाठी दाखवा.
• नाहीतर वर्षानुवर्षे असा तमाशा बघण्याची आपल्यावर वेळ येत राहिल.

 

एवढ्या कमी जागेत एवढी माणसं कशी काम करतात?

• ४० बाय ४०च्या जागेत ३८ माणसं कशी काम करतात?
• त्यामुळे २० माणसं वाचली यात आनंद मानायचा की दुर्दैव?
• ४० बाय ४०च्या ठोकळ्यात १०-१२ केमिकलच्या मशीन्स आहेत.

pravin tarde

प्रवीण तरडे मुळशीचे भूमीपूत्र

• प्रवीण तरडे हे मूळचे मुळशीचे भूमीपूत्र आहेत.
• वयाच्या विशीत त्यांनी काही वर्षे मुळशीतील कंपन्यांमध्ये कामही केले आहे.
• त्यामुळे त्यांना तेथील परिस्थितीची जाणीव आहे.
• त्यामुळे ते आग लागलेल्या कारखान्यातील परिस्थिती पाहून संतापले.


Tags: mulshi companypravin tardepuneप्रवीण तरडेमुळशी
Previous Post

कोकण रेल्वेत अकाउंटिंगच्या ११ पदांवर संधी, १ जुलैपर्यंत अर्ज करा!

Next Post

जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचले! रस्त्यांच्या नद्या, रुळांवर कालवे!

Next Post
mumbai

जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचले! रस्त्यांच्या नद्या, रुळांवर कालवे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!