मुक्तपीठ टीम
कोल्हापूर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ५५ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी ३० जागा अशा एकूण ८५ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १ जून २०२१ पर्यंत सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एमबीबीएस / बीएचएमएस/ बीएएमएस/ बीयूएमएस
२) पद क्र.२- बी.एससी (नर्सिंग)/ जीएनएम/ एएनएम असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मुलाखतीचे ठिकाण
कोल्हापूर महानगरपालिका, संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्य गृह छ. शाहू खासबाग मैदान शेजारी कोल्हापूर
अधिक माहितीसाठी
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट http://www.kolhapurcorporation.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: