मुक्तपीठ टीम
भारतीय तटरक्षक दलात सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर या पदासाठी ८ जागा, फोर्क लिफ्ट ऑपरेटर या पदासाठी १ जागा, एमटी (फिटर)/ एमटी मेकॅनिकल या पदासाठी ३ जागा, फायरमन या पदासाठी ४ जागा, इंजिन ड्रायव्हर या पदासाठी १ जागा, एमटीएस (चौकीदार) या पदासाठी १ जागा, लस्कर या पदासाठी १ जागा अशा एकूण १९ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड व हलके वाहनचालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
- पद क्र.२- आयटीआय (फोर्क लिफ्ट ऑपरेटर) + १ वर्ष अनुभव किंवा ३ वर्षे अनुभव + अवजड वाहनचालक परवाना
- पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील २ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १०वी उत्तीर्ण
- पद क्र.५- इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र
- पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) २ वर्षे अनुभव
- पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) बोटीवरील सेवेचा 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.