मुक्तपीठ टीम
इनकॉइज म्हणजेच इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसमध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट-३ या पदासाठी ०९ जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट-२ या पदासाठी २३ जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट-१ या पदासाठी ५९ जागा, प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी ३६ जागा, प्रोजेक्ट सायंटिफिक एडमिन असिस्टंट या पदासाठी ०६ जागा, एक्सपर्ट/ कंसल्टंट या पदासाठी ०५ जागा अशा एकूण १३८ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०९ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१ आणि पद क्र.२ साठी- १) महासागर विज्ञान/ वातावरणीय विज्ञान/ हवामान विज्ञान/ सागरी विज्ञान/ हवामानशास्त्र/ समुद्रशास्त्र/ भौतिक समुद्रशास्त्र/ भौतिकशास्त्र/ गणित/ प्राणीशास्त्र या विषयांत ६०% गुणांसह एमएससी/ एमटेक, एमएससी टेक किंवा मेकॅनिकल/ पर्यावरण/ केमिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर/ आयटी या विषयांत बीई/ बीटेक/ एमई/ एमटेक २) पद क्र.१ साठी ०७ वर्षे अनुभव तर, पद क्र. २ साठी ०३ वर्षे अनुभव असावा
- पद क्र.३- भौतिक समुद्रविज्ञान/ भौतिकशास्त्र/ महासागर तंत्रज्ञान/ भूभौतिकशास्त्र/ सागरी भूभौतिकी/ सागरी भूविज्ञान/ पृथ्वी विज्ञान या विषयात ६०% गुणांसह एमएससी/ एमटेक, एमएससी टेक
- पद क्र.४- ६०% गुणांसह बीएससी/ बीसीए/ इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.५- पदवीधर
- पद क्र.६- १) संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञानातील डॉक्टरेट पदवी किंवा संगणक/ माहिती तंत्रज्ञान/ अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी २) २० वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पद क्र.१ साठी ४५ वर्षांपर्यंत , पद क्र.२ साठी ४० वर्षांपर्यंत , पद क्र.३ साठी ३५ वर्षांपर्यंत , पद क्र.४ साठी ५० वर्षांपर्यंत, पद क्र.५ साठी ५० वर्षांपर्यंत, पद क्र.६ साठी ६५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय समुद्र प्रौद्योगिकी संस्थानच्या अधिकृत वेबसाइट https://www.niot.res.in/niot1/index.php वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://incois.gov.in/jobs/incois0722/home.jsp
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1-YVPq4ke7MUBv9DxvcTDihAE8SCZJY1N/view