मुक्तपीठ टीम
भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट या पदावर जनरल ड्यूटी ब्रांचमध्ये ३० जागा, कमर्शियल पायलट एंट्री ब्रांचमध्ये १० जागा तर, टेक्निकल इंजिनीअरिंग अॅंड इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये १० जागा अशा एकूण ५० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठ डॉट कॉमवरील करिअर कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- जनरल ड्यूटी- १) ६०% गुणांसह पदवीधर २) ६०% गुणांसह १२वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
- कमर्शियल पायलट एंट्री- १) ६०% गुणांसह १२वी उत्तीर्ण २) कमर्शियल पायलट लायसेन्स
- टेक्निकल इंजिनीअरिंग अॅंड इलेक्ट्रिकल- ६०% गुणांसह इंजिनीअरिंग पदवी (नेव्हलआर्किटेक्चर/ मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोटिव्ह/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रियल अॅंड प्रोडक्शन/ मेटलर्जी/ डिझाइन/ एरोनॉटिकल/ एरोस्पेस/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड पॉवर कम्युनिकेशन/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
जनरल ड्यूटी या ब्रांचसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २५ वर्ष, कमर्शियल पायलट एंट्री या ब्रांचसाठी १८ ते २५ वर्ष तर, टेक्निकल इंजिनीअरिंग अॅँड इलेक्ट्रिकल या ब्रांचसाठी २० ते २५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.