मुक्तपीठ टीम
भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून अर्ज मागविले आहेत. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) या पदासाठी १७५ जागा, शॉर्ट सर्व्हिस कमिशन डब्ल्यू (टेक) या पदासाठी १४ जागा, मृत्यू झालेल्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नींसाठी २ जागा अशा एकूण १९१ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, इंजिनीअरिंग पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीदेखील अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २७ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड प्राथमिक पात्रता चाचणी (पीईटी), एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल.
अधिक माहितीसाठी
भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.nic.in/home वरून माहिती मिळवू शकता.