Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डीआरडीओने विकसित केले फोर्जिंग तंत्रज्ञान, देश एअरो इंजिन तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण होणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
DRDO

मुक्तपीठ टीम

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ने २००० मे.टन आयसोथर्मल फोर्ज प्रेसचा वापर करून अवघड अशा टिटॅनियम मिश्रणापासून उच्च-दाबाचे कॉम्प्रेसर्स (एचपीसी) च्या पाचही टप्प्याचे उत्पादन करण्यासाठी निअर आइसोथर्मल फोर्जिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. हैदराबाद येथील डीआरडीओच्या डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (डीएमआरएल) या प्रमुख मेटलर्जिकल प्रयोगशाळेत हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. एयरोइंजिन तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे. या विकासासह, भारत अशा महत्वपूर्ण एअरो इंजिन घटकांची उत्पादन क्षमता असणाऱ्या मर्यादित जागतिक इंजिन विकासकांच्या लीगमध्ये सामील झाला आहे.

 

मोठ्या प्रमाणात उत्पादन गरजा पूर्ण करण्यासाठी, तंत्रज्ञान हस्तांतरण (एलएटीओटी) परवाना कराराद्वारे डीएमआरएल तंत्रज्ञान मेसर्स मिधानी कंपनीला हस्तांतरित करण्यात आले.

 

DRDO develops Critical Near Isothermal Forging Technology for Aeroengines https://t.co/PxwUZIcTRJ pic.twitter.com/pQkQhXC8pb

— DRDO (@DRDO_India) May 28, 2021

 

भारतात, ओईएमबरोबर परवानाधारक उत्पादन कराराअंतर्गत एचएएल (ई), बंगळुरू हे अडोर इंजिनची दुरुस्ती करत आहेत. कोणत्याही एरोइंजिनप्रमाणेच, एचपीसी ड्रम असेंब्ली देखील निर्दिष्ट केलेल्या परिचालनानंतर किंवा नुकसान झाले तर बदलली पाहिजे. या उच्च मूल्याच्या एचपीसी डिस्कची वार्षिक आवश्यकता बरीच मोठी असून स्वदेशीकरणाची हमी देतात. एचपीसी ड्रम ही उच्च दाबाची सब-असेंब्ली आहे आणि वाढीव तापमानात ती हळूहळू पुढे सरकते. एचपीसी ड्रम साठी कच्चा माल आणि फोर्जिंग उच्च दर्जाची असणे आवश्यक आहे जे स्थिर आणि गतिशील यांत्रिक गुणधर्मांचे विशिष्ट संयोजन पूर्ण करू शकेल.

 

डीएमआरएलने विविध विज्ञान आणि ज्ञान-आधारित साधनांचे एकीकरण करून हे फोर्जिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. डीएमआरएलने स्वीकारलेली कार्यपद्धती सर्वसमावेशक स्वरुपाची आहे आणि इतर एरोइंजिन घटक विकसित करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. या पद्धतीचा वापर करून तयार केलेले कंप्रेसर डिस्क्स इच्छित अनुप्रयोगासाठी उड्डाणासाठी पात्र एजन्सीद्वारे निर्धारित केलेल्या सर्व गरजा पूर्ण करतात.

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, उद्योग जगत आणि या महत्वपूर्ण एअरो इंजिनशी संबंधित तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये सामील असलेल्या इतर सर्व संस्थांच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.


Tags: AeroengineDefense Minister Rajnath SinghDRDOForging Technologyडीआरडीओसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह
Previous Post

आता देशाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यातून मिळवता येतील एम्सच्या डॉक्टरांचे सल्ले

Next Post

भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या १९१ जागांसाठी भरती

Next Post
Indian army

भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या १९१ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!