मुक्तपीठ टीम
आयकर विभागात खेळाडूंसाठी कर सहाय्यक या पदावर ०५ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर ०२ जागा अशा एकूण ०७ जागांवर नोकरीची संधी आहे. नोकरीचे ठिकाण केरळ आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) पदवीधर २) संबंधित क्रीडा पात्रता
- पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) संबंधित क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्ष तर, पद क्र.२ साठी १८ ते २५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
आयकर उपायुक्त मुख्यालय (प्रशासन) O/o प्रधान मुख्य आयकर आयुक्त, केरळ, सी.आर. बिल्डिंग, आय.एस. प्रेस रोड कोची ६८२०१८
अधिक माहितीसाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometaxindia.gov.in/Pages/default.aspx वरून माहिती मिळवू शकता.