मुक्तपीठ टीम
फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडूनने ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट टेक्निशियन, एलडीसी, टेक्निशियन आणि स्टोअरकीपर अशा एकूण ७२ जागांसाठी करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- तंत्रज्ञ (फील्ड लॅब रिसर्च) – उमेदवारांना विज्ञान विषयात १२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पद क्र.२-तंत्रज्ञ देखभाल: उमेदवारांना संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रासह मॅट्रिक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अधिकृत वेबसाइट https://fri.icfre.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
अधिकृत जाहिरात
https://fri.icfre.gov.in/wp-content/uploads/2022/12/20221219193938752.pdf








Subscribe