Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ करीता ऑनलाइन अर्ज नोंदणीस ०६ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
CIDCO

मुक्तपीठ टीम

सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ या गृहनिर्माण योजनेस मिळत असलेल्या नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि नागरिकांना केलेल्या मागणीमुळे सदर योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यास ०६ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या योजनेकरिता अर्ज नोंदणी करण्यास २२ डिसेंबर २०२२ ही अंतिम तारीख होती. परंतु अधिकाधिक नागरिकांना योजनेकरिता अर्ज करता येणे शक्य होऊन, त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे.   

सिडकोतर्फे या वर्षीच्या दिवाळीच्या शुभू मुहूर्तावर २४ ऑक्टोबर २०२२ रोजी महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ अंतर्गत नवी मुंबईच्या उलवे नोडमधील बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर पूर्व २ए, खारकोपर पूर्व २बी आणि खारकोपर पूर्व २पी येथे ७,८४९ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या योजनेद्वारे झपाट्याने विकसित होत असलेल्या व परिवहनदृष्ट्या समृद्ध असलेल्या उलवे नोडमध्ये परवडणाऱ्या दरातील घर घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. 

या योजनेतील गृहसंकुलांना नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी व खारकोपर रेल्वे स्थानकांसह महामार्ग, प्रस्तावित एमटीएचएल महामार्ग यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. तसेच सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या गृहसंकुलांपासून नजीकच्या अंतरावर असल्याने उलवे नोडला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.   

सुधारित वेळापत्रकाप्रमाणे महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ करीता ऑनलाइन अर्ज नोंदणी ०६ जानेवारी २०२३ पर्यंत करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज ०७ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करता येणार आहेत. ऑनलाइन शुल्क भरणा ०७ जानेवारी २०२३ पर्यंत करता येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारुप यादी १४ जानेवारी २०२३ रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी १८ जानेवारी २०२३ रोजी सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडणार आहे.


Tags: CIDCOCIDCO corporationcidco indiaCIDCO Mahagrihnirman Yojana Diwali - 2022Good news Morningगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगसिडको महागृहनिर्माण योजनासिडको महामंडळ
Previous Post

आता रोबोट डॉग बनणार स्मृतिभ्रंश आणि दृष्टिहीन लोकांचा आधार! जाणून घ्या ते कसे काम करतात…

Next Post

फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निशियन, एलडीसी, टेक्निशियन आणि स्टोअरकीपरसह ७२ जागांसाठी करिअर संधी

Next Post
Forest Research Institute

फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निशियन, एलडीसी, टेक्निशियन आणि स्टोअरकीपरसह ७२ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!