मुक्तपीठ टीम
कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची संधी आहे. विमा वैद्यकीय अधिकारी ग्रेड-२ या पदासाठी एकूण १ हजार १२० जागा आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) एमबीबीएस पदवी २) रोटेटिंग इंटर्नशिप अनिवार्य असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून २५० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://www.esic.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: