मुक्तपीठ टीम
कर्मचारी राज्य विमा महामंडळात उच्च श्रेणी लिपिक या पदासाठी ३१८ जागा, स्टेनोग्राफर या पदासाठी १८ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी २५८ जागा अशा एकूण ५९४ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) पदवीधर किंवा समतुल्य २) संगणकाचे ज्ञान
- पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) कौशल्य चाचणी नियम- डिक्टेशन: १० मिनिटे @८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी).
- पद क्र.३- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून २५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://www.esic.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.