मुक्तपीठ टीम
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये टेक्निकल ऑफिसर या पदासाठी एकूण १४ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी इंजिनीअरिंग पदवी २) १ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.ecil.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.