मुक्तपीठ टीम
गोवा सरकारच्या लेखा संचालनालयात अकाउंटंट पदाच्या एकूण १०९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, वाणिज्य शाखेत बीए पदवी किंवा मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून अर्थशास्त्र पदवी असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उमेदवाराला टायपिंग येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज या पत्यावर पाठवावा
प्राचार्य, सैनिक स्कुल सातारा, सातारा- ४१५००१, महाराष्ट्र
अधिक माहितीसाठी
अधिकृत संकेतस्थळ accountsgoa.gov.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पाहा.
पाहा व्हिडीओ: