मुक्तपीठ टीम
संरक्षण संपदा संघटनेत म्हणजेच डीजीडीईमध्ये कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदासाठी ०७ जागा, उपविभागीय अधिकारी, ग्रेड-२ या पदासाठी ८९ जागा, हिंदी टंकलेखक या पदासाठी ०१ जागा अशा एकूण ९७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/ इंग्रजी पदवी+हिंदी/ इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/ प्रमाणपत्र/ २ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) सर्वेक्षण/ ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा प्रमाणपत्र
- पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्ष तर, पद क्र. २ आणि ३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईडब्ल्यूएस/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
प्रधान संचालक, डिफेन्स इस्टेट्स, साउर्थन कमांड, ईसीएचएस पॉलीक्लिनिक जवळ, कोंढवा रोड, पुणे (महाराष्ट्र)- ४११०४०
अधिक माहितीसाठी संरक्षण संपदा संघटनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.dgde.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.