Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ट्विटर’वर घुसखोरी! अकाउंट काही वेळ हॅक, बिटकॉइनबाबत ट्वीट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
PM Narednra Modi twitter hacked-1

मुक्तपीठ टीम

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल रविवारी पहाटे काही काळ हॅक झाले होते. हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या @narendramodi या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीटही केले. हॅकरनी बिटकॉइनबद्दल ते ट्वीट केले. भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते. तसेच सरकार अधिकृतपणे ५०० बिटकॉइन्स खरेदी केल्याचाही उल्लेख होता. त्यानंतर काहीवेळातच पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांचे अकाऊंट काही काळासाठी हॅक झाल्याची माहिती दिली. मात्र, पंतप्रधानांसारख्या देशातील महत्वाच्या व्यक्तीचं अकाऊंट हॅक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

PM Narednra Modi twitter hacked-3

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचे @narendramodi हे वैयक्तिक अधिकृत ट्विटर हँडल आहे.
  • रविवारी, १२ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेच ट्विटर हँडल हॅकर्सनी हॅक केले होते.
  • त्यानंतर हॅकर्सनी भारताने बिटकॉईनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिल्याचे ट्विट केले.
  • तसेच भारत सरकार अधिकृतपणे ५०० बिटकॉइन्स खरेदी करत आहे, असेही ट्वीट त्यांनी केले.
  • ट्विट पहाटे २ वाजून ११ मिनिटांनी करण्यात आले होते, जे दोन मिनिटांत डिलीट करण्यात आले.
  • मात्र ते डिलीट करताच २ वाजून १४ वाजता दुसरे ट्विट करण्यात आले.
  • दोघांमध्ये बिटकॉइनबद्दलच मजकूर होता.
  • नंतर तेही डिलीट करण्यात आले.
  • यानंतर लगेच पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांचे ट्वीटर हँडल काही काळासाठी हॅक झाल्याचे जाहीर केले.
  • तसेच काही वेळातच ते ट्विटर हँडल पुन्हा सुरक्षित करण्यात आले आहे, असेही जाहीर करण्यात आले.

हॅकर्सनी काय केले होते ट्वीट?

PM Narednra Modi twitter hacked-2

  • हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट हॅक करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिटकॉईनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिल्याचे ट्वीट केले.
  • सरकार अधिकृतपणे ५०० बिटकॉइन्स खरेदी करत आहे. जे देशातील नागरिकांमध्ये वितरित केले जातील.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हॅक झालेल्या अकाऊंटवरून ट्विट झाल्यानंतर लोकांनी त्याचे स्क्रीन शॉट्स शेअर करण्यास सुरुवात केली.
  • लोकांनी या ट्विटकडे दुर्लक्ष करावे, असे पीएमओने म्हटले आहे.

 

The Twitter handle of PM @narendramodi was very briefly compromised. The matter was escalated to Twitter and the account has been immediately secured.

In the brief period that the account was compromised, any Tweet shared must be ignored.

— PMO India (@PMOIndia) December 11, 2021

हॅकिंगमागे बिटकॉइन माफिया असल्याचा संशय!

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल हॅक झाल्यानंतर देशात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
  • देशाचे पंतप्रधान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंटही हॅक होऊच कसे शकते? असा प्रश्न लोकांना पडला आहे.
  • हे काम बिटकॉइन माफियांचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
  • “जेव्हा देशाच्या पंतप्रधानांचे खाते सुरक्षित नसते. मग सर्वसामान्यांचे काय?” असे प्रश्नही विचारले गेले.

Tags: bitcoinbitcoin scamhackersPM Narendra moditwitterट्वीटरपंतप्रधान नरेंद्र मोदीबिटकॉइनहॅकर्स
Previous Post

डिरेक्टरेट जनरल डिफेंस इस्टेटमध्ये ९७ जागांसाठी सरकारी सेवेची संधी

Next Post

‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चा पनवेलमध्ये दोन दिवसीय वैचारिक नाट्य उत्सव

Next Post
थिएटर ऑफ रेलेवन्स

'थिएटर ऑफ रेलेवन्स'चा पनवेलमध्ये दोन दिवसीय वैचारिक नाट्य उत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!