मुक्तपीठ टीम
सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेचं सीसीआयने अभियंता आणि अधिकारी यांच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली. त्याअंतर्गत एकूण ४६ पदांची भरती करण्यात येणार आहे. यातील २९ पदे अभियंता पदासाठी आणि १७ पदे अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आलीत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
सीसीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अभियंता आणि अधिकारी पदावर नियुक्ती निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारे केली जाईल. निवडलेल्या तरुणांचा प्रारंभिक कार्यकाळ एक वर्षाचा असेल, जो कामगिरीनुसार ३ वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकेल.
शैक्षणिक पात्रता
अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी पदवी पदवी तसेच सीए/एमबीए/पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.पात्रतेसह किमान २ वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय ३० वर्षे असावे.
अशी केली जाईल निवड
सीसीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांची यादी केली जाईल आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, जर त्यांना या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती हवी असेल, तर ते अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी
सीसीआयच्या अधिकृत वेबसाइट https://www.cciltd.in/ वरून माहिती मिळवू शकता.