Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुणे विमानतळावरून देशभरात कोविशिल्ड लसीचे दहा कोटींपेक्षा जास्त डोस पाठवले

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
pune airport

मुक्तपीठ टीम

संपूर्ण भारतभर सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीच्या मात्रांच्या रवानगीचे केंद्र म्हणून पुणे विमानतळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.12 जानेवारी 2021 पासून 27 मे 2021 पर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 10 कोटीहून अधिक मात्रा, सुमारे 9052 नग (सुमारे 2,89,465 किलोग्राम वजनाच्या) पुणे विमानतळावरून विविध विमानांद्वारे दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, गोवा, जयपूर, पोर्ट ब्लेअर, विजयवाडा, भुवनेश्वर, पटना, लखनौ ,चंदीगढ, लेह, करनाल, हैदराबाद, गुवाहाटी, रांची, जम्मू, कोच्ची, देहरादून, श्रीनगर आणि त्रिवेंद्रम.यांसारख्या विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्या.
संपूर्ण देशभरात लस आणि अन्य आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरवठ्याची विनाअडथळा वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी देशभरातील सर्व विमानतळे योगदान देत आहेत.

 

भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि सर्व भागधारकांसह पुणे विमानतळाचा संपूर्ण चमू कोविशिल्ड लसीच्या मात्रांचे विनाअडथळा आणि सुरळीत वितरण सुनिश्चित करत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण , एएआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीरम इन्स्टिट्यूट, विमान कंपन्या आणि भारतीय हवाई दलाची समर्पित पथके पुणे विमानतळावरून लस घेऊन जाणाऱ्या विमानांच्या उड्डाणांचा समन्वय आणि प्राधान्यक्रम हाताळणे सुनिश्चित करत आहेत.

 

पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील लसींची रवानगी होत आहे. पुणे विमानतळावरून चार्टर्ड विमानाद्वारे फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीच्या सुमारे 2,16,000 मात्रा (570 किलोग्रॅम) सुरिनाम, सेंट किट्स, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनाडाइन्स, अँटिग्वा आणि बार्बुडा, सेंट लुसिया येथे पाठविण्यात आल्या. न्यूमोनिया प्रतिबंधक लसीच्या मात्रांचे सुमारे 161 नग (3670 किलोग्रॅम ) कोलकात्याला आणि कोरोना चाचणी संच पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना करण्यात आले.

या व्यतिरिक्त, पुणे विमानतळ प्रवाशांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार कोरोना संबंधित सर्व मार्गदर्शक सूचना आणि शिष्टाचाराचे पालन करत आहे. कोरोना प्रतिबंधक योग्य वर्तन पाळावे आणि गर्दी टाळण्याच्या दृष्टीने, विलंब न करता किमान वेळेत कार्य उरकण्याची विनंती विमानतळ कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवासी, भागधारक, अभ्यागत, कर्मचारी आदींना सतत केली जात आहे.

 

कोरोना प्रतिबंधासाठी योग्य वर्तनाबाबत जनजागृती, प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या सूचना अनेक इलेक्ट्रॉनिक आणि कायमस्वरुपी फलकांद्वारे विमानतळ टर्मिनलवर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

 

राज्य सरकार, भारतीय हवाई दल, पुणे महानगरपालिका आणि पुण्यातील विविध रुग्णालयांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने सर्व सुरक्षा आणि उपाययोजनांचा करून भारतीय विमान प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि इतर भागधारकांसाठी पुणे विमानतळावर लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 


Tags: coronaIndian Air Forcepmcserum-instituteपुणे महानगरपालिकापुणे विमानतळभारतीय हवाई दलराज्य सरकारसीरम इन्स्टिट्यूट
Previous Post

अखेर महाराष्ट्रात अधिकृत ‘अनलॉक’ची घोषणा! सोमवारपासून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटणार!

Next Post

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियात अभियंता पदावर संधी, ३० जूनपर्यंत करा अर्ज

Next Post
CCI

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियात अभियंता पदावर संधी, ३० जूनपर्यंत करा अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!