मुक्तपीठ टीम
भारत पेट्रोलियम मध्ये केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल या विषयात पदवीधर तर, केमिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रूमेंटेशन/ मेकॅनिकल या विषयात टेक्निशियन असणाऱ्यांसाठी ही अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. या पदांसाठी एकूण ८७ जागा आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पदवीधर- ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी
२) टेक्निशियन (डिप्लोमा)- ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारत पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाइट https://www.bharatpetroleum.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ:
रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र