मुक्तपीठ टीम
भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर आणि प्रोजेक्ट ऑफिसर पदांसाठी भरती आहे. ही भरती ७० जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी ६० गुणांसह बीई / बीटेक / बीएससी इंजिनियरिंग / इंटिग्रेटेड एमई / एमटेक. (मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कमिशन / इलेक्ट्रिकल अण्ड इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / सिविल / आयटी / ईसीई) [एससी / एसटी / पीडब्ल्यूडी: ५५% टक्के ] तसेच ०१ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. प्रोजेक्ट ऑफिसर पदासाठी ६० गुणांसह एमबीए / एमएसडब्ल्यू / पीजी डिप्लोमा (एचआर) / सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए (फायनान्स / मार्केटिंग / फॉरेन ट्रेड / सप्ले चेन मॅनेजमेंट) [एससी / एसटी / पीडब्ल्यूडी: 55% गुण] १ वर्ष अनुभव वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
०५ मार्च २०२१ रोजी १८ ते २८ वर्षापर्यंत असावे.तर एससी आणि एसटीसाठी ५ वर्षांची सूट आणि ओबीसीसाठी ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्यां जनरल आणि प्रवर्गासाठी ओबीसी ३०० रुपये आणि एससी , एसटीसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.
अधिक माहितीसाठी भारत डायनेमिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://bdl-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.