मुक्तपीठ टीम
भाभा अणु संशोधन केंद्रात पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ८ जागा, कनिष्ठ/ वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ८ जागा, सामान्य ड्युटी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ४ जागा, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी १ जागा, रुग्णालय प्रशासक या पदासाठी १ जागा अशा एकूण २२ जागांसाठी संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- एमएस/ एमडी/ डीएनबी पदवी/डिप्लोमा
- पद क्र.२- एमबीबीएस+एक वर्षाची इंटर्नशिप किंवा एमबीबीएस+पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा
- पद क्र.३- १) एमबीबीएस २) १ वर्ष अनुभव
- पद क्र.४- १) एमडी/ डीएनबी (जनरल मेडिसिन) २) ५ वर्षे अनुभव
- पद क्र.५- १) एमबीबीएस २) रुग्णालय प्रशासन डिप्लोमा ३) ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय पद क्र.१ आणि २ साठी ४० वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी ५० वर्षांपर्यंत, पद क्र. ४ आणि ५ साठी ६५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भाभा अणु संशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट http://www.barc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.