मुक्तपीठ टीम
कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (एओ) या पदासाठी ४४ जागा, फायनान्स अॅन्ड अकाउंट्स ऑफिसर (एफ अॅन्ड एओ) या पदासाठी २१ जागा अशा एकूण ६५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) ५५% गुणांसह पदवीधर २) संगणकाचे ज्ञान
२) पद क्र.२- १) ५५% गुणांसह पदवीधर २) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून २० रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी
एएसआरबीच्या अधिकृत वेबसाइट http://www.asrb.org.in/
वरून माहिती मिळवू शकता.