मुक्तपीठ टीम
लष्कराच्या नॉर्थर्न कमांड मुख्यालयात फायरमन आणि लेबर या पदांसाठी एकूण १७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान
२) पद क्र.२- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
५४७१ एएससी बटालियनचे रिसेप्शन सेंटर (रिक्रूटमेंट सेल) बर्फानी मंदिराजवळ एसडी कॉलेज समोर, पठाणकोट कॅन्ट (पंजाब)
अधिक माहितीसाठी
भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.