मुक्तपीठ टीम
भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात जनरल मॅनेजर, डेपो मॅनेजर, मूवमेंट मॅनेजर, अकाउंट्स मॅनेजर, टेक्निकल मॅनेजर, सिव्हिल इंजिनीअरिंग मॅनेजर, इलेक्ट्रिकल अॅंड मेकॅनिकल इंजिनीअरिंग मॅनेजर, हिंदी मॅनेजर या पदांसाठी एकूण ११३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१, २ आणि ३ साठी- ६०% गुणांसह पदवीधर किंवा सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीएस
- पद क्र.४- बीकॉमसह एमबीए इन फायनान्स किंवा एमबीए इन फायनान्स पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता
- पद क्र.५- बीएससी (कृषी)/ बीटेक/ बीई (अन्न विज्ञान/ खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान/ खाद्य तंत्रज्ञान/ खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान/ खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी/ खाद्य प्रक्रिया/ अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान/ औद्योगिक जैव-तंत्रज्ञान/ जैव-रसायन अभियांत्रिकी/ कृषी जैव -तंत्रज्ञान
- पद क्र.६- सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी
- पद क्र.७- इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी
- पद क्र.८- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ ते ७ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असावे तर, पद क्र. ८ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय अन्न महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://fci.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.recruitmentfci.in/current_category_two_main_page.php?lang=en
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1yd5JxOVYKmSJ706yVQHa1bGDw3gue_Om/view