मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र महसूल विभागात तलाठी पदांवर एकूण ४ हजार १२२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही २०२३ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून नमूद करण्यात आलेली नाही आहे. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी
- मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल वर्गातील उमेदवारांचे वय, १८ ते ३८ वर्षांपर्यंत तर, इतर राखीव वर्गातील उमेदवारांचे वय १८ ते ४३ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल वर्गातील उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, इतर राखीव वर्गातील उमेदवारांकडून ३५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://www.maharashtra.gov.in/1125/Home वरून माहिती मिळवू शकता.
महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम
https://drive.google.com/file/d/11DJcig-mbpaYIu8RfpQ9JCauUrqwHYNM/view