मुक्तपीठ टीम
भाभा अणुसंशोधन केंद्रात परिचारिका, वैज्ञानिक सहाय्यक बी पॅथॉलॉजी, वैज्ञानिक सहाय्यक बी, वैज्ञानिक सहाय्यक, आणि उप अधिकारी बी या पदांसाठी अर्ज मागवले आहे. या पदांसाठी एकूण ३६ जागांवर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
वैज्ञानिक सहाय्यक
- पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना B.Sc मध्ये ६०% गुण असावेत.
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी (DMLT) ६०% गुणांसह
- B.Sc (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) ६०% गुणांसह.
परिचारिका पदासाठी
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी नर्सिंग आणि मिडवाइफरीमधील तीन वर्षांच्या डिप्लोमासह बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- राज्य नर्सिंग कौन्सिलकडून परिचारिका म्हणून वैध नोंदणी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट recruit.barc.gov.in वरून माहिती मिळवू शकता.
अर्ज करण्यासाठी नोकरीची लिंक
https://recruit.barc.gov.in/barcrecruit/appmanager/UserApps/getDocument?action=docfile&pid=664