मुक्तपीठ टीम
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने बँकांमध्ये लिपिक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत देशातील सर्व राज्यांतील विविध सरकारी बँकांमध्ये हजारो पदांवर लिपिकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२१ आहे.
शैक्षणिक पात्रता
आयबीपीएस लिपिक भरती अंतर्गत बँकेत नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, पदवी अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील भरती परीक्षेस येऊ शकतात.
ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये परीक्षा
- आयबीपीएस परीक्षा दिनदर्शिका २०२१ नुसार लिपिक भरती परीक्षा २०२१ ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये घेण्यात येईल.
- आयबीपीएस लिपिक प्रिलिम्स परीक्षा २०२१ २८ ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येईल.
- यानंतर, ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी लिपिक मेन्सची परीक्षा घेण्यात येईल .
वयाची अट
०१ जुलै २०२१ रोजी २० ते २८ वर्षे [एससी/एसटी: ०५ वर्षे सूट, ओबीसी: ०३ वर्षे सूट]
शुल्क
अर्ज करण्यासाठी जनरल आण ओबीसी प्रवर्गासाठी ८५० आणि एससी, एसटीसाठी १७५ रुपये शुल्क आकारले आहेत.
असा करावा अर्ज
- ऑनलाइन अर्ज करावा लागेल यासाठी तुम्हाला आयबीपीएसच्या ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- आयबीपीएस वेबसाइटच्या होमपेजवरील CRP ClerkXI या लिंकवर क्लिक करा.
- सर्वात आधी New Registration वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- यानंतर नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीचे डिटेल्स भरावे लागतील.
- रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून उमेदवार IBPS Clerk २०२१ साठी अर्ज करू शकतात.
अधिक माहितासाठी
आयबीपीएसच्या अधिकृत https://www.ibps.in/ वर माहिती मिळू शकेल.