मुक्तपीठ टीम
भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदावर एकूण १ हजार ६७३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://ibpsonline.ibps.in/sbiposep22/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1Jvci2whMsTQ090Q3IU4D9CakEwUEHKo9/view








Subscribe